सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 764 कोटी रुपयेचा निधि लाडकी बहीन योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ पँथर आर्मीचे इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उद्या लाक्षणिक उपोषण आंदोलन

सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 764 कोटी रुपयेचा निधि लाडकी बहीन योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ पँथर आर्मीचे इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उद्या लाक्षणिक उपोषण आंदोलन

सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 764 कोटी रुपयेचा निधि लाडकी बहीन योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ पँथर आर्मीचे इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उद्या लाक्षणिक उपोषण आंदोलन

इचलकरंजी दि .सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 764 कोटी रुपयेचा निधि लाडकी बहीन योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ पँथर आर्मीचे इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उद्या लाक्षणिक उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे .

महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसाद विनायकराव कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी 02/05/2025 रोजी काढलेल्या जी .आर . नुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा कडील 410 कोटी 30 लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाकडील 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीन योजने करिता वळीवण्यात आला आहे . या शासन निर्णयाचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जाहीर निषेध करित आहे .
अर्थसंकल्पात अनु जाती व अनुसूचित जमातीचा निधी हा त्याच सर्वगातील विकासाठी खर्च करावा असा केंन्द्र सरकाच्या निति आयोगाकडील मार्गदर्शक सूचना असताना हे राज्य शासन पळवाटा शोधून अनु जाती व अनुसूचित जमाती यांचा निधीवर दरोडा टाकत आहे .राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनु . जाती उपयोजना ( SCSP) करिता 22 हजार 658 कोटी तर अनुसुचित जमाती उपयोजना (TSP ) 21 हजार 495 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्या पैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग साठी सहाय्यक अनुदान ( वेतनेतर ) तीन हजार 960 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे . त्या पैकी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीन योजनेला वर्ग करण्यात आला . तसेच आदिवासी खात्याकडील तीन हजार 420 कोटी रुपये सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजने करिता वळवण्यात आला असे एकुन 746 कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाला वर्ग केला गेला आहे
अनु जाती व अनुसूचित जमातीच्या विकासाचा निधि इतर खात्याकडे विळविणे म्हणजे अर्थिक नाकेबंदी करून त्यांना मुलभूत विकासापासुन वंचित ठेवणे असा होतो .
केंन्द्र सरकारच्या निति आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार अनु जाती व अनुसूचित जमाती यांना अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक असते . पण हे राज्य सरकार निति आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना तिलांजली देऊन त्याचे आर्थिक हक्क नाकारत आहे . या समाजाचा शैक्षणीक सामाजिक व आर्थिक विकास होऊ नये या जातीवादी मानसिकतेतून त्यांच्या हक्काचा निधि इतर खात्याकडे वळवून त्यांना विकास योजना पासुन वंचित करत आहेत .

अनु जाती व अनुसूचित जमाती च्या निधिवर दरोडा टाकणाऱ्या अर्थमंत्री , महिला व बालकल्याण मंत्री आदेश काढणारे महामहीम राज्यपाल यांचा जाहीर निषेध म्हणून पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस आठवले यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर मंगळवार दि.06/05/2025 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण आंदोलन करित आहोत असे निवेदनात म्हटले आहे .
निवेदनावर मच्छिंद्र रुईकर , संजय कांबळे, नितेश दिक्षांत , संतोष करात , बाळू कराळे यांच्या सह्या आहेत .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *