महावितरणचा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी तीस हाजाराची लाच घेताना लाचलुचपच्या जाळ्यात
इचलकरंजी दि . शहरातील महावितरण चे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना तीस हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले आहे त्यामुळे महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या या कारभारामुळे इचलकरंजीत खलबळ माजली आहे वरिष्ठ अधिकारीच जाळ्यात सापडल्याने महावितरण कार्यालयासमोर नागरिकांनी फटाके वाजवून आनंदोस्तव साजरा केला .
नवीन अपार्टमेंट मधिल 18 फ्लॅटचे विज जोडणी चा ठेका तक्रारदार इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर यांनी संबधीत मालकाकडून घेतला होता . विज जोडणी मंजुरी करिता लागणारा अर्ज व अवाश्यक ती कागदपत्रे जोडून तक्रारदार यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे 18 फ्लॅटचे प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे एकुण 90000 हजार रुपये द्यावे लागतील तरच प्रकरण मंजुर होईल असे म्हणुन यांचेकडे लाचेची मागणी केली होती . त्या नंतर तक्रारदार यांनी कोल्हापुर लाचलुचप विभागाकडे तक्रार दिली होती . तक्रारादाच्या तक्रारी नुसार लाचलुचप प्रतिबंध विभागाने पडताळणी केली असता तक्रारदाराकडे कार्यकारी अभियंता राठी यांने 90000 रुपयांचे मागणी केल्याचा दुजोरा मिळाला . तडजोडी अंती 30000 रुपये लाच स्विकारताना कार्यकारी अभियंता प्रशांत राठी याला पकडण्यात आले आहे .
सदरबाबत आरोपी प्रशांत ताराचंदजी राठी वय ,49 व्यवसाय नोकरी पद कार्यकारी अभियंता वर्ग – १ महावितरण विभागीय कार्यालय इचकरंजी सध्या राहणार उपकार रेसिडेन्सी प्लॅट नंबर ०६ , बिग बाजार जवळ सांगली रोड इचलकरजी ता हातकणंगले जि कोल्हापुर मुळ राहणार धामनगाव ता धामनगाव जि अमरावती यांचे विरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाणे इचकरंजी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
सदर तक्रारीमुळे कोल्हापूर लाचलूचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली महावितरण चा मोठा मासा गळाला लागला असे नागरिकांतून बोलले जात आहे मात्र असे अनेक मासे महावितरण मध्ये आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करून महावितरण स्वच्छ करून घ्यावे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे सदर कारवाई श्री शिरीष सरदेशपांडे पोलिस उपायुक्त / अधीक्षक अँटी करपशन ब्युरो पुणे, विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक अँटी करपशन ब्युरो पुणे यांचे मार्गदर्शनानुसार, वैष्णवी पाटील, पोलीस उपधीक्षक, स पो फौ प्रकाश भंडारे, पो. हे. कॉ, संदीप काशीद, पो. ना. सचिन पाटील, पो कॉ उदय पाटील स पो फौ गजानन कुराडे, चा. पो. कॉ. प्रशांत दावणे, ला प्र वी कोल्हापूर, अँटी करपशन ब्युरो कोल्हापूर अधिक तपास करत आहेत.