पुणे ( प्रतिनिधी)
डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी, यू एस ए , यांच्या ग्रेस लेडीज ग्लोबल अलायन्स अंतर्गत महिलांसाठी महिला सक्षमीकरण, ग्लोबल लीडरशिप, अशैक्षणिक कौशल्यास प्राधान्य देणे, जागतिक स्तरावर महिलाना पुढे आणणे , महिला मधील सुप्त गुणांना वाव देणे, आर्थिक स्वावलंबन देणे या उद्देशाने जीएलजीए गेली 16 वर्ष महिलांसाठी कार्य करत आहे.
नुकतेच ग्लोबल अलायन्स अंतर्गत जगभरातून ” ग्लोबल लीडर” नियुक्त करण्यासाठी एकूण ४५ अर्ज आले होते. ज्या महिला महिला सक्षमीकरणाचे काम करत आहेत त्याच बरोबर विविध क्षेत्रात कार्य करत आहे अश्या महिलांना ग्लोबल लीडर हे पद देण्यात येते.
भारतातून , महाराष्ट्रातील पुणे येथील डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची यासाठी निवड करण्यात आली. डॉ . रिता गेली २० वर्ष करत असलेले सामाजिक , शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य आणि गेल्या चार वर्षापासून जी एल जी ए च्या भारतासाठीच्या राजदूत म्हणून करत असलेले कार्य यामुळेच त्यांची आम्ही ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती करत आहोत , असे जीएलजीए च्या संस्थापिका डॉ. सोना पांडे म्हणाल्या.
ग्लोबल अलायन्स चा उद्देश एकत्रित या (connect), सहयोग करा (collaborate ) आणि निर्माण करा ( Create) हा आहे. ही संस्था विशेषतः महिलांसाठी कार्य करते. या संस्थेतर्फे नुकताच डॉ. रिता यांना “ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड” 2025 देण्यात आला.