रुकडीचे सुपुत्र सुनील मारुती भारमल यांना “राष्ट्रीय आदर्श समाजसेवक पुरस्कार 2024-25” जाहीर
रुकडी, (तालुका- हातकणंगले) गावाचे सुपुत्र आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच सक्रीय आणि अग्रेसर असणारे श्री. सुनील मारुती भारमल यांना पै. सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “राष्ट्रीय आदर्श समाजसेवक पुरस्कार 2024-25” जाहीर झाला आहे.
श्री. सुनील भारमल यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत, हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. समाजसेवा, युवकांमध्ये जनजागृती, शैक्षणिक मदतकार्य तसेच ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नांवर कार्य करणाऱ्या भारमल यांच्या कार्याची ही राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित पातळीवर नोंद झाली आहे.
या गौरवामुळे रुकडी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.