तारदाळात हातकणंगले एक्साईजचा छापा :
मद्यसाठा वाहनसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त
अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. २५ (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हातकणंगले तालुक्यातील तारदाळ व आळते येथे एक्साईज हातकणंगले विभागाच्या कारवाईत एम. एच. १३ सी. डब्ल्यू. ९६२३ स्प्लेंडर सह १८० मी.ली. देशी दारुचे १६ बॉक्स, ९० मी.ली. चे २१८ बॉक्स असे २३४ बॉक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत ८,७६,७६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बबलू उर्फ राजकुमार अशोक घाटकर व.व. ३६ रा.सुळकुडे मळा, पेठ भाग हातकणंगले जि. कोल्हापूर या आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
या कारवाई हातकणंगले एक्साईज निरीक्षक महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक कोमल यादव, दुय्यम निरीक्षक रुपाली क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड, कॉन्स्टेबल सागर शिंदे, जवान सुशांत बनसोडे, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथक १, इचलकरंजी निरीक्षक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास दुय्यम निरीक्षक कोमल यादव करत आहेत.
हातकणंगले हद्दीत अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री व वाहतूक आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई मोहीम राबविणार असलेचे एक्साईज निरीक्षक महेश गायकवाड यांनी सांगितले.