पँथर आर्मी तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

कोल्हापुर : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हा शाखा कोल्हापुर यांचा वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
कोल्हापूरातील शाहू स्मारक भवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले होते .
सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचा हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले . ज्येष्ट विचारवंत डॉ शरद गायकवाड यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरित्रावर व्याखानाचा कार्यक्रम संपन्न झाला

.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ट पत्रकार डॉ दगडू श्रीपती माने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाटगे यांचा सन्मानपत्र ,सन्मान चिन्ह , शाल पुष्पगुच्छ व कोल्हापुरी फेटा बांधून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला . यानंतर श्रावण बाळ वृद्धा आश्रम (अकिवाट ) च्या मुख्य कार्यवाहिका श्रीमती शोभा पानदारे (शिरढोण ) डॉ सविता शेटीया (पुणे ) प्रतिभा हेगडे (कोल्हापुर ) दैनिक सम्राटचे पत्रकार दत्ता सुर्यवंशी , ज्येष्ट साहित्यक भगवानराव थेंडे (पुणे ) शेषराव करकिलीकर (लातुर ) हिंदरत्न डॉ दिपक लोंढे (सांगली ) अनिल लोंढे (शिरोळ ) रामराव दाभाडे (कराड ) रमेश बाबू जोंधळे (उदगीर )मा . श्री .राजेंद्र आण्णा मोहीते .किरण बाळू चौगुले
बार्टी सामाजिक कार्यकर्ते दिनकर मल्लू पाटील दिगंबर गोविंद कुलकर्णी ,रमेश कांबळे

वनपरिक्षेत्र अधिकारी,फिरते पथक सांगली, सतीश भुपाल घाटगे वळीवडे .समाधान मोरे कोनवडे डॉ. विजय प्रभू ,शोएब श. शेख सामाजिक कार्यकर्ते , रुकडी ,विकास बबन बुरुंगले
अध्यक्ष, भटक्या विमुक्त जाती जमाती ,निवास केरबा आवळे
शिरोळ.पद्माकर दत्तात्रय नार्वेकर. रंगराव गणपती कांबळे. ग्रामपंचायत सद्स्य यड्राव.उत्तम दगडू जगताप. सुधीर बबन आदमाने. सचिन दादासो बोराडे हातकणंगले प्रा.अशोक शंकर कांबळे, आळतेकर ॲड .ममतेश आवळे ,लखन एकनाथ कांबळे परितेकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक , लक्मीकांत कुंबळे ज्योतीताई झरेकर , बाळासाहेब साळवी , स्वाती माजगांव , सुजाता कांबळे , संजय कांबळे नितेशकुमार दिक्षांत , भैय्यासाहेब धनवडे , संतोष खरात ‘ आदी उपस्थित होते .
स्वागत पँथर आर्मी कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी तर प्रास्ताविक ॲड ममतेश आवळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सामंत यांनी केले तर आभार अमोल कुरणे यांनी मानले .
