अण्णा भाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आघाडीचे शिलेदार – डॉ. शरद गायकवाड

अण्णा भाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आघाडीचे शिलेदार – डॉ. शरद गायकवाड

अण्णा भाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आघाडीचे शिलेदार – डॉ. शरद गायकवाड

कोल्हापुर प्रतिनिधी : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा दृढनिश्चय हृदयाशी बाळगून प्राणपणाने संघर्ष करून 106 हुतात्म्यांच्या त्या समर्पण आणि हौतात्म्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अण्णा भाऊ साठे हे आघाडीचे शिलेदार होते असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने सत्यशोधक, साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती . अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले होते .
कोलहापुर येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन मध्ये डॉ. गायकवाड हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.

मुंबई कोणाची अर्थात मुंबई आमची यासारखे प्रभावशाली लोकनाट्य लिहून अण्णा भाऊ साठे यांनी लाखो मराठी बांधवांच्या मध्ये आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून पुलिंग चेतविले. वाघाला नखआणि गरुडाला पंख जितके प्रिय आणि जितके अविभाज्य आहेत तितकीच मुंबईही मराठी मुलखाला म्हणजेच महाराष्ट्राला एकजीव एकरूप आणि अविभाज्य असल्याचे अण्णा भाऊंनी शेकडो साहित्य कृतींच्या माध्यमातून त्याकाळी मराठी माणसांच्या गळी उतरवून मराठी भाषा ,मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती च्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी आयुष्यभर संघर्ष केला असे डॉ. गायकवाड यांनी अनेक उदाहरणंच्या माध्यमातून सविस्तर मांडणी केली.


मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि दिव ,दमन च्या साठी अण्णाभाऊंनी केलेला संघर्ष महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णाभाऊंनी दिलेले योगदान युगप्रवर्तक आणि स्वरूपाचे असल्याचे सांगून डॉ. शरद गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ट पत्रकार डॉ दगडू श्रीपती माने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाटगे यांचा सन्मानपत्र ,सन्मान चिन्ह , शाल पुष्पगुच्छ व कोल्हापुरी फेटा बांधून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला . यानंतर श्रावण बाळ वृद्धा आश्रम (अकिवाट ) च्या मुख्य कार्यवाहिका श्रीमती शोभा पानदारे (शिरढोण ) डॉ सविता शेटीया (पुणे ) प्रतिभा हेगडे (कोल्हापुर ) दैनिक सम्राटचे पत्रकार दत्ता सुर्यवंशी , ज्येष्ट साहित्यक भगवानराव थेंडे (पुणे ) शेषराव करकिलीकर (लातुर ) हिंदरत्न डॉ दिपक लोंढे (सांगली ) अनिल लोंढे (शिरोळ ) रामराव दाभाडे (कराड ) रमेश बाबू जोंधळे (उदगीर )मा . श्री .राजेंद्र आण्णा मोहीते .किरण बाळू चौगुले
बार्टी सामाजिक कार्यकर्ते दिनकर मल्लू पाटील दिगंबर गोविंद कुलकर्णी ,रमेश कांबळे


वनपरिक्षेत्र अधिकारी,फिरते पथक सांगली, सतीश भुपाल घाटगे वळीवडे .समाधान मोरे कोनवडे डॉ. विजय प्रभू ,शोएब श. शेख सामाजिक कार्यकर्ते , रुकडी ,विकास बबन बुरुंगले
अध्यक्ष, भटक्या विमुक्त जाती जमाती ,निवास केरबा आवळे
शिरोळ.पद्माकर दत्तात्रय नार्वेकर. रंगराव गणपती कांबळे. ग्रामपंचायत सद्स्य यड्राव.उत्तम दगडू जगताप. सुधीर बबन आदमाने. सचिन दादासो बोराडे हातकणंगले प्रा.अशोक शंकर कांबळे, आळतेकर ॲड .ममतेश आवळे ,लखन एकनाथ कांबळे परितेकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक शेतमजुरांचे नेते सुरेश सासने , पँथर आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे , महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योतीताई झरेकर , जिल्हाअध्यक्षा स्वाती माजगांवे , सुजाता कांबळे , कोल्हापुर जिल्हा महासचिव नितेश कुमार दिक्षांत , जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे , संतोष खरात , भैय्यासाहेब धनवडे आदीच्या सह संपूर्ण महाराष्ट्रातून अण्णाभाऊ प्रेमी सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .


कार्यक्रमाचे स्वागत पँथर आर्मीचे कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी तर प्रास्ताविक ॲड ममतेश आवळे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सामंत यांनी केले आभार अमोल कुरणे यांनी मानले .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *