महावितरणच्या टोप संभापूर येथील उपकेंद्राचे सीएमडी लोकेश चंद्र यांच्याहस्ते उद्घाटन
उद्यम सोसायटीच्या औद्योगिक ग्राहकांना होणार लाभ
कोल्हापूर, दि.07 ऑगस्ट 2025 : टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याहस्ते उद्घाटन झाले. याचा लाभ कोल्हापूर उद्यम सोसायटी भागधारक तथा परिसरातील संभाव्य औद्योगिक ग्राहकांना लाभ होणार आहे.
यावेळी या महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, सीएमडी यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या उपकेंद्राचे काम नवीन सेवा जोडणी योजनेतून करण्यात आले आहे. या उपकेंद्रात १० एमव्हीएचे दोन रोहित्रे बसवण्यात आले असून ६ किमीची भूमिगत उच्चदाब वाहिनी व ७ किमीची उच्चदाब ओव्हरहेड वाहिनी टाकण्यात आली आहे. या उपकेंद्रातून एकूण ३ वाहिन्या निघाल्या आहेत. याचा लाभ टोप संभापूर औद्योगिक वसाहत(उद्यम सोसायटी) येथील ग्राहकांना तसेच शिरोली, वडगाव व अंबप येथील प्रस्तावित औद्योगिक ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. यावेळी लोकेश चंद्र यांच्या हस्ते वृक्षारोपण कऱण्यात आले.
फोटो ओळ – टोप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) उपकेंद्राचे उद्घाटन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याहस्ते झाले. सोबत उपस्थित मान्यवर.