पुणे ( प्रतिनिधी)
ज्ञानदायिनी शैक्षणिक सामाजिक संस्था पुणे , “आदर्श माता पुरस्कार 2025” सन्मान सोहळा व एकल पालकांच्या 100 गरजु मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दिनांक 10 ऑगस्ट 2025 , वार रविवारी सकाळी 11:30 वाजता, स्थळ डिफेन्स हाँल, डिफेन्स काँलनी, निलज्योती हौसिंग सोसायटी गोखले नगर पुणे 16, येथे होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री, सूर्यकांत पाटिल (मंडल आधिकारी पुणे) पांडुरंग अंकुशराव माजी कॅप्टन, डॉ, गौतमी पवार माजी प्रिन्सिपल गरवारे काँलेज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री, यशवंत मानखेडकर माजी डेपुटि डायरेक्टर नेहरु युवा केंद्र पुणे उपस्थित राहणार आहे .
यावेळी ज्या महिलांनी अत्यंत खडतर परिस्थितीशी लढा देऊन मुलांना घडविले आहे अशा रण रागिणींचा सन्मान ” आदर्श माता ” पुरस्कार देऊन केला जाणार आहे. यामध्ये एचसी. डॉ सविता मदनलाल शेटीया, राजसबाई प्रभू मानखेडकर, डॉ. गौतमी पवार , सोनाली घोडके, धोंडाबाई गोतसुर्वे आणि शारदा गायकवाड यांना देण्यात येणार आहे.
तसेच एकल पालकत्व असलेल्या गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाणार आहे. असे कार्यक्रमाचे आयोजक प्रा, वंदना मधुकर सरवदे, संस्थापक अध्यक्ष आणि प्रा. मधुकर एम सरवदे संस्थापक सेक्रेटरी ज्ञानदायिनी शैक्षणिक सामाजिक संस्था यांनी सांगितले आहे.
तरी या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.