बस्तवाड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.संगीता सुधाकर कांबळे यांची बिनविरोध निवड…
बस्तवाड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अम्माजान पाटील यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामूळे ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची खास सभा बोलवण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी मच्छिंद्रनाथ कुंभार होते. तर या निवडीसाठी तलाठी गौरव कनवाडकर, प्रभारी ग्रामसेवक संतोष चव्हाण उपस्थित होते.
प्रारंभी सरपंचपदासाठी संगीता सुधाकर कांबळे यांचे नाव सदस्या आशा नाईक यांनी सुचवले. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे सरपंचपदी संगीता सुधाकर कांबळे यांची बिनविरोध निवड सभाध्यक्ष, मच्छिंद्रनाथ कुंभार यांनी घोषित केली. यावेळी त्यांचा सत्कार मंडल अधिकारी मच्छिंद्रनाथ कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी केली.
यावेळी जाफर पटेल, अशोक मगदूम प्रा. साहेबलाल पटेल, शब्बीर नाईकवाडे, पारिसा कांबळे, सुधाकर कांबळे, अमर कांबळे, मावळत्या सरपंच श्रीमती अम्माजान पाटील, उपसरपंच श्रीशैल्य जंगम, बाळासो कोळी, कृष्णा कांबळे, शानाबाई लाटकर, किरण कांबळे या मान्यवरासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.