साजणी येथे माजी सरपंच व दिव्यांग निराधार वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माहा मेळावाचे आयोजन…
कोल्हापूर (हातकणंगले).. येथे माजी सरपंच व दिव्यांग निराधार वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माहा मेळावा दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी 11:30 वाजता शेतकरी भवन साजणी येथे आयोजित करण्यात आला आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सानिया सुतार (माजी सरपंच साजणी ) कार्यकामाच्या कार्याध्यक्षा मा.सौ.मंगल मिणचेकर (माजी सरपंच तीळवणी ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मा. फिरोज मुल्ला (सर ) मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई (सचिन खरात गट )हे उपस्थित राहणार आहे मा.शिरीष देसाई (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी), दिपक भोसले (जिल्हा अध्यक्ष रिपाई आ.),सतीशदादा माळगे (जिल्हा सचिव रिपाई आ.)यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे . .
मा.ऍड.महेश कांबळे,मा.ऍड.शरद कांबळे, मा. ऍड. राहुलराज कांबळे, मा. ऍड.भीमसेन कांबळे, हे कायदेतज्ञ मंडळी कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत माजी आमदार कै.कॉ. के. एल. मलाबादे,कै.कॉ. नाना शेटे,कै.कॉ. दत्तात्रय झपाटे, समाजभूषण कै. हरिशचंद्र कांबळे,कै.काशिनाथ कांबळे त्यांच्या कार्याचे आदर्श म्हणून सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या हुतात्मेच्या नावाने विचारपीठ करण्यात आले आहे
या कार्यक्रमा मध्ये गुणवंत विध्यार्थी,माजी सरपंच,प्रमुख मान्यवरांचा सन्मान,विध्यार्थ्यांना शालीय साहित्य वाटप,अपंग व गोरगरीब निराधार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व निमंत्रक रुई गावाचे माजी सरपंच मा. जयसिंगराव बापू कांबळे हे आहेत