रुई जिल्हा परिषद मतदार संघ राखीव होण्याचे संकेत………..
डॉ.विशाल कांबळे साजणीकर जिल्हा परिषद लढण्याच्या तयारीत
साजणी ( ता – हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विशाल कांबळे साजणीकर आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर साहेबांचे विश्वासू शिलेदार ज्यांनी विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाची जबाबदारी खांद्यावर घेऊन मतदार संघ पिंजून डॉ.मिणचेकरांच्या प्रचाराची धुरा सांभाळली तसेच आमदार डॉ.सुजित मिणचेकर विचार मंच आणि डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशन च्या माध्यमातून युवकांचे संघटन तसेच साजणी, तिळवणी, रुई, माणगाव, अतिग्रे, मुडशिंगी लोकांची कामे पेन्शन, रेशनधान्य व इतर कामासाठी आंदोलने, उपोषणे, धरणे, निवेदने या माध्यमातून कामे केली आहेत आणि हे सर्व असताना महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे साहेबांचा सततचा संपर्क व उपाध्यक्षांचे कोल्हापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय व विश्वासू व्यक्ती म्हणून प्रा.डॉ.विशाल कांबळे साजणीकर हे ओळखले जातात मागील कालावधीत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्याने साजणी येथे स्टँडवर सुमारे 300 ते 400 महिलांचा फौज फाटा घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला व प्रोटोकॉल नसतानाही अजित दादा पवार हे विशाल कांबळे यांच्या सांगण्यावरून थांबले आणि सध्याचा विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून विविध कामे व वारंवार भेट यावरून डॉ.विशाल कांबळे साजणीकर हे रुई जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे आणि हा मतदारसंघ राखीव होण्याचे संकेत आहेत