
कोल्हापूर (हातकणंगले).. येथे माजी सरपंच व दिव्यांग निराधार वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माहा मेळावा शेतकरी भवन साजणी येथे संविधानाच्या उद्देशीकेचे वाचून करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ. सानिया अब्दुल सुतार (माजी सरपंच साजणी )यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मा. फिरोज मुल्ला (सर ) मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई (सचिन खरात गट )यांनी जनतेला संबोधित करताना म्हणाले राज्य सरकार माजी सरपंचांना भविष्यासाठी कुठलीच तरतूद करत नसल्यामुळे संघटन उभं करून न्याय मिळवावा लागतो हे दुर्दैव आहे न्याय मिळून घेण्यासाठी मुंबई येथील आजाद मैदानावर लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभा करावं लागेल आणि त्याच बरोबर महापुरुषांचा खरा इतिहास पण आपण वाचला पाहिजे कारण महापुरुषांनी जातविरहित कार्य केले मानवता धर्म असा आदर्श दिला आणि तो आपण जपला पाहिजे भारत देश संविधानावर चालतो आणि ते संविधान आपण जपलं पाहिजे अशा महत्वाच्या विषयाची माहिती देत जनतेला फिरोज मुल्ला (सर )यांनी संबोधित केले

यावेळी मा.शिरीष देसाई (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी), दिपक भोसले (जिल्हा अध्यक्ष रिपाई आ.),सतीशदादा माळगे (जिल्हा सचिव रिपाई आ.) मा.ऍड.महेश कांबळे,मा.ऍड. शरद कांबळे, मा. ऍड. राहुलराज कांबळे, मा. ऍड.भीमसेन कांबळे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन रुई गावाचे माजी सरपंच मा. जयसिंगराव बापू कांबळे यांनी केले माजी आमदार कै.कॉ. के. एल. मलाबादे,कै.कॉ. नाना शेटे,कै.कॉ. दत्तात्रय झपाटे, समाजभूषण कै. हरिशचंद्र कांबळे,कै.काशिनाथ कांबळे यांचे सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या हुतात्मेच्या नावाने विचारपीठ करण्यात आले या कार्यक्रमा मध्ये गुणवंत विध्यार्थी,माजी सरपंच,प्रमुख मान्यवरांचा सन्मान,विध्यार्थ्यांना शालीय साहित्य वाटप,अपंग व गोरगरीब निराधार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माजी सरपंच व जन समोदाय बहुसंख्येने उपस्थित होते
