सुवर्णमहोत्सवी वाटचाल सर्वार्थाने सक्षमपणे करूया ; समाजवादी प्रबोधिनीच्या ४८ व्या वार्षिक सभेतील संकल्प

सुवर्णमहोत्सवी वाटचाल सर्वार्थाने सक्षमपणे करूया ; समाजवादी प्रबोधिनीच्या ४८ व्या वार्षिक सभेतील संकल्प

सुवर्णमहोत्सवी वाटचाल सर्वार्थाने सक्षमपणे करूया

समाजवादी प्रबोधिनीच्या ४८ व्या वार्षिक सभेतील संकल्प

इचलकरंजी ता.११ लोकप्रबोधनाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या आणि वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या समाजवादी प्रबोधिनीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी येथे संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाली.
प्रारंभी सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेत डॉ . अशोक चौसाळकर,प्रसाद कुलकर्णी, प्रा. भारती पाटील, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, प्राचार्य आनंद मेणसे, डॉ. काशिनाथ तनंगे, प्रा. विजयकुमार जोखे, प्रा. शिवाजीराव होडगे, बी. एस. खामकर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

सभेचा समारोप करताना डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, समाजवादी प्रबोधिनी ही प्रबोधन प्रकाशन ज्योती हे मासिक गेली साडे तीन दशके नियमितपणे प्रकाशित करणारी, गेली चार दशके तीस हजारांवर ग्रंथ आणि शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध असे अ वर्ग प्राप्त प्रबोधन वाचनालय चालविणारी , तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्य, कला अशा समाजजीवनातील सर्व विषयात सातत्यपूर्ण लोकप्रबोधनाचे, जनजागरणेचे उपक्रम आयोजित करणारी महाराष्ट्रातील एक महत्त्वाची संस्था आहे. अशा पद्धतीचे काम समाजजीवनाची गरज असते. समाजवादी प्रबोधिनी आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. सुवर्ण महोत्सवी वाटचालीत संस्था सर्वार्थाने अधिक सक्षम करण्याचा संकल्प या वार्षिक सभेत आपण सर्वजण मिळून करीत आहोत. त्याला सर्व समाज घटकांनी भरभरून साथ द्यावी असे आवाहन यानिमित्ताने आम्ही करीत आहोत. यावेळी विविध मान्यवरांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी जयकुमार कोले,प्रा. अनिल उंदरे, प्राचार्य साताप्पा कांबळे, के. एस.दानवाडे, सागर सरगाणाचे, प्रा. अशोक आलगोंडी, कीर्तिकुमार दोषी, प्रा.बी. आर. जाधव, वैशाली पवार, अमोल वडर, धुळगोंडा पाटील, बाळासाहेब कदम,एस.एस. जाधव , प्रा.रमेश लवटे, सौदामिनी कुलकर्णी, रवी जाधव, पांडुरंग पिसे, रामदास कोळी, शकील मुल्ला,दयानंद लिपारे, राजन मुठाणे,नंदा हालभावी, कविता डांगरे, देवदत्त कुंभार, सचिन पाटोळे, नौशाद शेडबाळे, श्रेयस लिपारे,आदींसह प्रबोधिनी परिवारातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.अन्वर पटेल यांनी आभार मानले.

फोटो : वार्षिक सभेत बोलताना प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अशोक चौसाळकर , मंचावर प्राचार्य आनंद मेणसे, प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील, प्रसाद कुलकर्णी आणि प्रा. डॉ.भारती पाटील

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *