पुणे ( प्रतिनिधी)
ज्ञानदायिनी शैक्षणिक सामाजिक संस्था पुणे , यांच्या वतीने श्रीमती सुशीला अप्पासाहेब माने या नावाने “आदर्श माता पुरस्कार 2025” आणि एकल पालकांच्या 100 गरजु मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सोहळा दिमाखात साजरा

ज्या महिलांनी अत्यंत संघर्ष आणि खडतर परिस्थितीशी लढा देऊन मुलांना घडविले आहे अशा रण रागिणींचा सन्मान ” आदर्श माता ” पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत मानखेडकर (माजी डेप्युटी डायरेक्टर नेहरु युवा केंद्र, भारत सरकार) यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये राजसबाई प्रभू मानखेडकर, डॉ. गौतमी पवार ( माजी प्राचार्य गरवारे कॉलेज) , एचसी. डॉ सविता मदनलाल शेटीया ( संस्थापक अध्यक्षा रिता इंडिया फाउंडेशन) , सोनाली घोडके, धोंडाबाई गोतसुर्वे आणि शारदा गायकवाड यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित पाहुण्याच्या हस्ते १० ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले. वंदना सरवदे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हे पुरस्कार या वर्षापासून देण्याचे ठरविले आहे.
यावेळी सगळ्यांच्याच मनाला भावले ते ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. वंदना मधुकर सरवदे, संस्थापक सेक्रेटरी प्रा. मधुकर म्हंकाल सरवदे यांनी सर्व पुरस्कार्थी मातांचे केलेले पूजन .
यावेळी मानखेडकर सर म्हणाले , आज वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली असतांना या संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वांनाच आई वडिलांचे महत्व सांगणारा आहे . भावी पिढीला हे समजणे खूप गरजेचे आहे.
प्रमुख पाहुणे प्रविण शिंदे संचालक पुणे मध्यवर्ती सहकारी बँक म्हणाले , एखाद्या गावातून पुण्यात येऊन समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेणे हे तितके सोपे नाही. पण सरवदे कुटुंबाने गेली २० वर्ष आदिवासी, कृष्ठरोगी आणि वंचित मुलांचे शैक्षणिक कार्य अविरत चालू ठेवले आहे.
पुरस्कारार्थी डॉ. गौतमी पवार ( माजी प्राचार्य गरवारे कॉलेज) म्हणाल्या, आपला विद्यार्थी समाजासाठी इतके चांगले कार्य करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. तसेच आपल्या गुरूंचा सन्मान आदर्श माता पुरस्कार देऊन करणे खूप महत्त्वाचे आहे.
पुरस्कारार्थीना अंजनेय साठे ( युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते) यांच्या कडून वॉटर जग आणि डब्बा देण्यात आला. त्याचबरोबर पल्लवी हेमाडे यांच्या कडून कणी महिला मंच ची एक वर्षाची मेंबरशिप देण्यात आली.
या कार्यक्रमास श्री. सूर्यकांत पाटिल (मंडल आधिकारी पुणे), पांडुरंग अंकुशराव (माजी कॅप्टन भारतीय सैन्य दल), डॉ. निता बोडके (आखिल मराठी साहित्य मंडळ पुणे शहर आध्यक्ष), राहुल खरात (जागतीक अखंड मानवतावादी संमेलन समन्वयक), उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रिता शेटीया आणि शुभम ताजने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्तिकी सरवदे, संस्थेचे सभासद संतोष माने, सुजाता माने, व्यंकटेश सुर्यवंशी, आकांक्षा धोत्रे, शैलेश उनवने, भाग्यश्री खेसे (पुणे महानगरपालिका आधिकारी) यांनी मोलाचे सहकार्य केले.