प्रबोधन वाचनालयास ग्रंथपाल दिनी विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
इचलकरंजी ता. १२ भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती अर्थात भारतीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाला डी.के.ए.एस.सी कॉलेजमधील बी.ए. व एम. ए. च्या मराठी विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी अभ्यास भेट दिली. प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव ,प्रा.रोहित शिंगे आणि प्रा.भारती कोळेकर यांनी चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनींसह ही अभ्यास भेट दिली. यावेळी डॉ. सुभाष जाधव यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते वाचनालयातील ग्रंथालय सेवकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.सुभाष जाधव यांनी सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व आणि वाचन संस्कृती विस्ताराची गरज यावर मनोगत व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी आणि कविता डांगरे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना ग्रंथालयीन कामकाजाची सविस्तर माहिती दिली. प्रा. रोहित शिंगे यांनी आभार मानले.