डॉ. जे. जे. मगदूम यांचा १३ वा स्मृतिदिन स
डॉ. जे जे मगदूम ट्रस्टचे संस्थापक चेअरमन डॉ. जे. जे. मगदूम यांची १३ वी पुण्यतिथी त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांच्या मनोगताने साजरी करण्यात आली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम यांच्या हस्ते डॉ. जे जे. मगदूम यांच्या फोटोचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले. डॉक्टर साहेब एक दृष्टे शिक्षण महर्षी होते असे कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे म्हणाले. संस्थेच्या यशात विद्यार्थ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे असे प्राचार्य डॉ. मुलगुंड यांनी आपले मत व्यक्त केले .
डॉ.जे.जे.मगदूम साहेबांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देताना, स्वकर्तुत्वावर शैक्षणिक ट्रस्टची स्थापना करून आदर्श घडवणारे, अतिशय खडतर परिस्थितीतून या संस्था उभा करण्यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जे.जे.मगदूम असे संबोधून इतिहासाला उजाळा देत लहानपणाच्या आठवणी ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
कार्यक्रमासाठी सर्व डिन्स, विभाग प्रमुख, रजिस्टार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डी. आर. माने यांनी केले.
Posted inकोल्हापूर
डॉ. जे. जे. मगदूम यांचा १३ वा स्मृतिदिन स
