
कोल्हापूर, दि. १५ (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुन्हा अन्वेषण मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कर्तव्यदक्ष अधिकारी एक्साईज कागल विभागाचे सीनियर इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर, निवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर ॲड. आर. आर. पाटील, एक्साईज करवीर विभागाचे इन्स्पेक्टर समीर पाटील, पेठ वडगाव पोलीस स्टेशनच्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अनिता पवार,

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क एक्साईज कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे सीनियर इन्स्पेक्टर किरण पवार, फॉरेस्ट ऑफिसर भरारी पथकाचे प्रमुख रमेश कांबळे, एक्साईज शाहुवाडी विभागाचे इन्स्पेक्टर किरण बिरादार, एक्साईज करवीर विभागाचे दुय्यम निरीक्षक अजित घोसाळकर यांना परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने प्रोबस क्लबचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, सकल मराठा संघटनेचे निवासराव सूर्यवंशी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित गौरवण्यात आले.

याप्रसंगी जलसंपदा अभियंता भाग्येश पवार, कॉन्स्टेबल शंकर मोरे, जवान जयदीप ठमके, संदीप जानकर, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राज कुरणे, संस्थेचे संचालक रौनक धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.