शिरोळ येथे शासकीय मुलांचे वस्तीगृह, निवासी शाळेत डॉ दगडू माने यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात
शिरोळ : प्रतिनिधी –
मौजे आगर ( ता शिरोळ ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह व निवासी शाळा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व राज्य शासन समाजभूषण डॉ दगडू श्रीपती माने यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी वसतिगृहाचे अधीक्षक डॉ. उत्तम कोळी , मुख्याध्यापक प्रदीप जवाहिरे, डॉ दगडू माने यांनी मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादरीकरण तसेच कवायत सादर केली. कार्यक्रमास गृहपाल बी जे खोडके, सहाय्यक शिक्षक कुणाल कांबळे , राहुल गुडीमणी , अकीब मुजावर, सम्मेद पाटील , माया कांबळे, रावसाहेब भोसले, सचिन कमलाकर यांच्यासह शालेय विद्यार्थी पालक तसेच बीव्हीजी कर्मचारी व क्रिस्टल कर्मचारी उपस्थित होते.