समाजावादी प्रबोधिनीत ध्वजारोहण झ
इचलकरंजी ता.१६ समाजवादी प्रबोधिनी, प्रबोधन वाचनालय आणि चंद्रशीला कॉमर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनीच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम अपराध यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी तुकाराम अपराध, ईश्वरी पाटील आणि देवराज चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. उज्वला जाधव यांनी प्रेरणादायक कविता सादर केली. यावेळी प्रसाद कुलकर्णी , प्रा. रमेश लवटे ,दयानंद लिपारे,पांडुरंग पिसे, शकील नदाफ, आनंदसा खोडे,सद्दामहुसेन कारभारी, अब्दुल नदाफ, सतीश कांबळे, पूजा आगर, मनोहर जोशी, भीमराव नायकवडी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्राची चौगुले यांनी सूत्रसंचलन केले.