डॉ.मगदूम इंजिनीरिंगचा ‘अव्हेंसिटी युनिव्हर्सिटीशी ‘(पॅरिस-कचन)सामंजस्य करार

डॉ.मगदूम इंजिनीरिंगचा ‘अव्हेंसिटी युनिव्हर्सिटीशी ‘(पॅरिस-कचन)सामंजस्य करार

डॉ.मगदूम इंजिनीरिंगचा ‘अव्हेंसिटी युनिव्हर्सिटीशी ‘(पॅरिस-कचन)सामंजस्य करार
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने ‘ अव्हेंसिटी qस्कूल फॉर टेक्नॉलॉजी बिझनेस अँड सोसायटी, (पॅरिस – कचन) या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य कराराची प्रत कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांना प्रा. अमोद भट (सीनियर मॅनेजर,आशिया) यांनी सुपूर्द केली यावेळी श्री. महालक्ष्मी अकॅडमीचे प्रा. केळकर उपस्थित होते .
परदेशी विद्यापीठाचे महत्व विशद करताना सामंजस्याची फलश्रुती म्हणून व्यवसाय तंत्रज्ञानातील उदयनमुख ट्रेडसवर प्रा. अमोद भट यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, सहयोगी प्रकल्पासाठी भरती आणि फ्रेंच संस्थेमध्ये संवाद सुरू करणे, जागतिक नागरिकत्वासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे यासह भविष्यातील शैक्षणिक आणि तंत्रज्ञानावर चर्चा केली.
ए. आय. डिजिटल व्यवसाय विश्लेषण, उद्योगाच्या मागण्या,रोजगार उद्दिष्टांची भागीदारी,व्यवसायातील शाश्वतता डिजिटल परिवर्तन व भविष्यातील करिअर घडवण्यात ए. आय. आणि डेटा ची भूमिका त्यांनी विद्यार्थ्यांना विशद केली.
भविष्यातील सहकार्यासाठी रोड मॅप, विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व सह ब्रांडेड प्रमाणपत्रे, कार्यशाळा, वेबिनार आणि प्रकल्प यासारख्या संयुक्त उपक्रमांची सविस्तर चर्चा मा. व्यवस्थापन व महाविद्यालयीन प्रशासन यांच्याशी करण्यात आली.
परदेशी विद्यापीठाशी करार करून महाविद्यालयाने चांगले पाऊल उचलले आहे. या करारातून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या स्कॉलरशिपसह संधी उपलब्ध होणार आहेत असे ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी सांगितले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. शुभांगी पाटील, प्रा. सौरभ खानावळे, प्रा. एस. एस. खोत यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *