स्वातंत्र्य लढ्यात हिंसा नव्हे तर अहिंसा महत्त्वाची होती
स्वातंत्र्य सैनिक सन्मान परिषदेत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
सांगली:१७ स्वातंत्र्यलढ्यात जात-पात धर्म यावर सर्वसामान्य माणसां वाद नव्हता ब्रिटिशांनी धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांनी अहिंसेतून स्वतंत्र मिळवून दिले असे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी ॲड. अजितराव सूर्यवंशी, डॉ. जयपाल चौगुले, प्रेमचंद पांडयाजी, डॉ.लता देशपांडे,रत्नाकर गोंधळी, युवराज शिंदे, नितीन मिरजकर,प्रा. बाबुराव माने, प्रणव पाटील, राजेंद्र कवठेकर, प्रा. नितीन ढाले, गौतम शिंगे, प्रा.शुभांगी जगताप,सचिन सूर्यवंशी यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड मुकुंद शंकर वैद्य यांना कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.
कुलकर्णी पुढे म्हणाले, उजवी विचारधारा स्वतंत्र लढ्यात लढत होती ती इंग्रजांच्या बाजूने.या लोकांनी गेल्या 30 वर्षात विचारवंतांना हायजॅक केले .विचार मारले जात आहेत .या जनसुरक्षा विधेयक हे रोलेट ऍक्टप्रमाणे आहे या देशाला अति डाव्यापासून नाही तर अति उजव्या पासून धोका आहे. दिवसेंदिवस संविधांनाची विचारधारा पातळ केली जात आ.हे आर्थिक कुचंबणा होत आहे. हळूहळू तिरंग्याचे महत्त्वही कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे पुरोगामी विचारधारा समजून घेऊन ती रुजविण्यास आपल्या घरापासून सुरुवात करूया वर्तमान अस्वस्थ असला तरी अशक्य काही नाही असेही ते म्हणाले.
ॲड .अजितराव सूर्यवंशी यांनी प्रस्तावनेमध्ये सांगली जिल्ह्यातील थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू असून प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला त्या त्या महिन्यातील जन्मलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीला कळण्याची रुजण्याची गरज आहे यासाठी स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.याची सुरुवात आपण करत आहोत .
यावेळी डॉ. देशपांडे बाल विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांती गीत सादर केले. शेवटी जयपाल चौगुले यांनी आभार मानले.