प

कोल्हापुर : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापुर जिल्हा शाखेची विविध सामाजिक मुलभूत प्रश्न व प्रस्तावीत आंदोलने , जातनिहाय जनगनणा व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात बैठकीत स्वस्तर चर्चा करण्यात आली . अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे होते .
पँथर आर्मी चे संस्थापक संतोष एस आठवले यांनी संघटनेचा विस्तार कसा करावा आणि सामाजिक मुलभूत प्रश्नांची शासन दरबारी कशी सोडवणूक करता येईल याचे व आगामी जातनिहाय जनगनणा 2027 मध्ये नोंदी कश्या प्रकारे द्याव्यात याचे मार्गदर्शन केले . तर अमोल कुरणे यांनी महाराष्ट्रातील वाढता जातीय अत्याचार विरोधी ॲट्रॉसिटी कायदयाचा योग्य वापर कसा करावा आणि शासकीय योजनांचा लाभ अनु जाती समृहांना प्रशासनातील अधिकारी नकार देत असतील त्यांचा वर कारवाई करण्या संदर्भात पँथर आर्मी संघटनेने पुढाकार घ्यावा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पँथर आर्मी च्या पदाधिकारी यांनी निवडणुका लढवण्या बाबत मार्गदर्शन केले .
यावेळी कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर , जिल्हा महासचिव नितेश कुमार दिक्षांत , जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे , शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे , शिरोळ तालुका कार्याध्यक्ष पिंटू वराळे , शिरोळ तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब धनवडे , बाळु कराळे , अजित कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते .