जयसिंगपुरात निळे वादळ अवतरले ; जय भीमच्या जयघोषाने परिसर दुमदुमला🌐 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत

जयसिंगपुरात निळे वादळ अवतरले ; जय भीमच्या जयघोषाने परिसर दुमदुमला🌐 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत

जयसिंगपूर :
गेल्या ५० वर्षापासून भीमसैनिकांचे स्वप्न असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे, जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव, भव्य आतषबाजी, साखरपेड्यांचे वाटत करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात ‘ना भूतो ना भविष्यतो’ असा आगमन सोहळा संपन्न झाला.
जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली. प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली.


शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदणी रोडवरील डेबॉन्स कॉर्नर पासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केले. नांदणी नाका ते बौद्ध विहार पासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केले. अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, वडार समाज, कोळी समाज, मातंग समाज, जैन समाज, लिंगायत समाज, चर्मकार समाज बांधवांनी पेढे, लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. या मिरवणुकीत महिला लेझीम पथक, धनगरी ढोल, दाक्षिणात्य ढोल पथक, ऐतिहासिक बोलके चित्ररथ, डीजे साऊंड, डान्स ग्रुप, नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी, महिला दांडपट्टा, करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळे वादळ निर्माण झाले होते. या वाद्यांच्या निनादात तरुणाई सुद्धा थिरकली होती. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, बोलो रे बोलो जय भीम बोलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोषाने आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला.
या आगमना सोहळ्यात भीम कन्या दिपाली शिंदे यांचे भाषण, जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे चित्ररथाचे, नाट्य शुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा देखावा हा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नांदणी नाका – दिनबंधू सोसायटी – बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक, रामचंद्र डांगे, अमरसिंह पाटील, प्रमोद पाटील, विजय पवार, रमेश शिंदे, संजय शिंदे, डॉ. दगडू माने, सतीश मलमे, रणजीत पाटील, आदित्य पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, अनिरुद्ध कांबळे, विकास कांबळे, देवेंद्र कांबळे, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, मिलिंद शिंदे, बाळासाहेब कांबळे, अनुप मधाळे, धम्मपाल ढाले, अक्षय आलासे, सुनील कुरुंदवाडे, सागर बिरणगे, उमेश आवळे, शशिकांत घाटगे, शरद कांबळे, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, विश्वास कांबळे, कैलास काळे, संतोष आठवले, राजेंद्र प्रधान, बजरंग खामकर, राजेंद्र आडके, संभाजी मोरे, राहुल बंडगर, असलम फरास, राजेंद्र झेले, रजनीकांत कांबळे, ॲड. संभाजीराजे नाईक, दादासो पाटील चिंचवाडकर, बाळासो वगरे, पराग पाटील, गणेश गायकवाड, अर्जुन देशमुख, महेश कलकुटगी, अनुराधा आडके, आसावरी आडके, शैलेश आडके, सागर मादनाईक, सुभाष मुरगुंडे, बबन यादव, जॉन सकटे यांच्यासह शिरोळ तालुक्यात सह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते.

चौकट :
बौद्ध बांधवांसह बहुजन समाज बांधवांची मोठी गर्दी

गेल्या ५० वर्षापासून जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, अशी मागणी होती. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा केला त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि या आगमन सोहळ्यात बौद्ध समाजासह बहुजन समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडविले.

आमदार यड्रावकर यांनी शब्द पाळला

गेल्या विधानसभा निवडणुकीत जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे अभिवचन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले होते. हे वचन त्यांनी पूर्ण केल्याने बौद्ध समाज बांधवांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर या दोन बंधूंचा सत्कार केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *