डॉ. मगदूम इंजिनिअरिंग मध्ये एन.एस.एस. दिवस उत्साहात साजरा
जयसिंगपूर- येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एन.एस.एस.युनिट २०२५ चे उदघाट्न व एन. एन. एस. दिवस,उत्साहात साजरा करण्यात आला.
नागरिकांमध्ये स्वच्छता, समाजसेवा व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.मुख्य अतिथी डॉ. पी. एस. पांडव (उप-कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटक झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील होत्या.
एन.एस.एस. केवळ स्वच्छता व समाजसेवा न्हवे तर विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास व नेतृत्वगुणांना संधी देणे आहे असे डॉ. पांडव म्हणाले तसेच गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून वास्तविक बदल घडवू शकतात, नियमितपणे समाजसेवा उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकत एनएसएसच्या उपक्रमात असते असे प्राचार्या म्हणाल्या.प्रा. पी. पी. पाटील (डीन, स्टुडंट्स वेल्फेअर) यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले,कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. चौगुले यांनी एन.एस.एस.ची स्थापना, उद्दिष्टे व विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक प्रभाव याबाबत माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन डॉ. ऍड. सोनाली मगदूम, आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांचे प्रोत्साहन लाभले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. ए. एम. मोरे यांनी मानले.