डॉ. मगदूम अभियांत्रिकी कडून पूरग्रस्त पीडिताना मदतीचा हात
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा भागातील पूरग्रस्त पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते करण्यात आली.
ट्रस्टचे चेअरमन, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमुठे यांच्या प्रेरणेतून प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एन.एस.एस. व कम्युनिटी सेलच्या वतीने मदत संकलित करण्यात आली. मदतीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व स्टाफनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
प्रा. पी. ए. चौगुले, डी. आर. माने, डॉ. ए. एम. मोरे यांच्या सोबत कु. साईनाथ करवडे,प्रणव कांबळे,पवनजीतसिंह गौड,सार्थक देवकुळे, सार्थक शिंदे,अथर्व शिंदे,साक्षी नाकाडी,स्नेहल सोमणे या विद्यार्थ्यांनी मदत संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला.
Posted inकोल्हापूर
डॉ. मगदूम अभियांत्रिकी कडून पूरग्रस्त पीडिताना मदतीचा हात
