जीवघेण्या जी.बी.एस. आजारावर मात : कोल्हापूरच्या सी.पी.आर. रुग्णालयाचे वैद्यक क्षेत्रातील आश्चर्य !नऊ महिन्यांच्या उपचारानंतर २१ वर्षीय समर्थ लोखंडे यांचा जीवनदान

जीवघेण्या जी.बी.एस. आजारावर मात : कोल्हापूरच्या सी.पी.आर. रुग्णालयाचे वैद्यक क्षेत्रातील आश्चर्य !नऊ महिन्यांच्या उपचारानंतर २१ वर्षीय समर्थ लोखंडे यांचा जीवनदान

जीवघेण्या जी.बी.एस. आजारावर मात : कोल्हापूरच्या सी.पी.आर. रुग्णालयाचे वैद्यक क्षेत्रातील आश्चर्य !

नऊ महिन्यांच्या उपचारानंतर २१ वर्षीय समर्थ लोखंडे यांचा जीवनदान

कोल्हापूर, दि. १० (प्रतिनिधी) वैद्यकीय क्षेत्रातील आश्चर्य म्हणावी अशी घटना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात सी.पी.आर.येथे घडली आहे. पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेला २१ वर्षीय समर्थ लोखंडे हा “जी.बी.एस.” (Guillain-Barré Syndrome) या जीवघेण्या आजाराने ग्रस्त झाला होता. गेल्या नऊ महिन्यांच्या अखंड वैद्यकीय प्रयत्नानंतर आज समर्थ पूर्णपणे बरा होऊन स्वतःच्या पायावर चालू लागला आहे.
समर्थ लोखंडे हा इंदिरा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” शाखेचा विद्यार्थी असून, २५ जानेवारी २०२५ रोजी अचानक त्याच्या हातपायांची ताकद पूर्णपणे गेली व श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. तत्काळ त्याला पुण्यातील एका नामांकित मोठ्या हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे व्हेन्टिलेटरवर ठेवून महागडी IUIG इंजेक्शन्स व Plasma Pharesis उपचार करण्यात आले, मात्र तब्येतीत सुधारणा झाली नाही. तब्बल ५० दिवसांच्या उपचारानंतरही निराशाजनक स्थिती राहिल्याने त्याला कोल्हापूरच्या सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सी.पी.आर. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल झाल्यावर वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. बुध्दिराज पाटील यांच्या नेतृत्वा खालील पथकाने समर्थच्या उपचारासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. या पथकात डॉ. मंगेश शिंदे, डॉ. गोपाल तिवारी, डॉ. आदिती मालजी, डॉ. अमृता जाधव, डॉ. सागर गायधन, डॉ. रोहन झा, डॉ. बाळासाहेब भोसले आणि डॉ. सुस्मित शहा यांचा समावेश होता. तसेच फिजिओथेरपी तज्ञ डॉ. ऋतूराज शिंदे यांनी सातत्याने पुनर्वसनाचे प्रशिक्षण देऊन समर्थला नवजीवन दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, माजी अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे व डॉ. अनिता परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपचार प्रक्रिया यशस्वी ठरली.
आज समर्थ आपल्या पायावर चालत घरी परतला असून, त्याचे पालक आणि संपूर्ण वैद्यकीय पथक यांच्यासाठी ही अभिमानास्पद आणि भावनिक क्षण ठरला. समर्थच्या पुनर्वसनाची ही कहाणी सी.पी.आर. रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या समर्पणाचे आणि कुशलतेचे प्रतीक ठरली आहे.
याप्रसंगी समाजसेवा विभागातील बाजीराव आपटे, अजित भास्कर आदी उपस्थित होते.
यावेळी लोखंडेच्या पालकांनी अधिष्ठाता, सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक यांचे आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *