कनेरी मठ येथे आरोग्य विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा कुंभमेळा’!महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यस्तरीय आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचा ‘सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट’ मध्ये उत्साहात शुभारंभ

कनेरी मठ येथे आरोग्य विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा कुंभमेळा’!महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यस्तरीय आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचा ‘सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट’ मध्ये उत्साहात शुभारंभ

कनेरी मठ येथे आरोग्य विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा कुंभमेळा’!
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यस्तरीय आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचा ‘सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट’ मध्ये उत्साहात शुभारंभ
कणेरीमठ (कोल्हापूर): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५’ चा उद्घाटन सोहळा कणेरी मठाच्या पावन सानिध्यात दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो आरोग्य विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा ‘क्रीडा कुंभमेळा’ ठरला.
मठाधिपती व आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाचे ४९ वे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून या भव्य क्रीडा महोत्सवाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार व स्वागत समारंभ पार पडला. या वेळी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील, विविध वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्यमंत्र्यांनी दिला आरोग्याचा मंत्र
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर म्हणाले, “क्रीडा ही केवळ जिंकण्यासाठी नसून ती शिस्त, मेहनत आणि संघभावना शिकवणारी जीवनशैली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग विद्यार्थी म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी खेळ हा आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी स्पर्धात्मकतेचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
या दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक जिल्ह्यांतील वैद्यकीय व नर्सिंग संस्थांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. विवेक सिद्ध यांनी केले, तर डॉ. वर्षा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्घाटन सोहळा संपताच विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत विविध क्रीडा प्रकारांना प्रारंभ झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *