सिद्धार्थनगर दंगल प्रकरणात आणखी १५ आरोपींना अटक; १५ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
कोल्हापूर (प्रतिनिधी):
२२ ऑगस्ट रोजी सिद्धार्थनगर परिसरात झालेल्या दंगल प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तपासात मोठी कामगिरी करत आणखी १५ आरोपींना अटक केली आहे. यापूर्वीच १० जणांना अटक झाली होती, त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता २५ झाली आहे.
दंगलाचे कारण आणि गुन्हे दाखल:
२२ ऑगस्टच्या रात्री एका मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेल्या डिजिटल फलकावरून दोन गटांत वाद झाला होता. या वादानंतर मोठा संघर्ष होऊन दगडफेक, जाळपोळ आणि मारामारी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आणि कोठडी:
या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी यापूर्वी १० जणांना अटक केली होती. आता आणखी १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पंधरा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे पोलिसांना पुढील तपास आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी मदत होणार आहे.
अटक केलेल्यांची नावे:
अटक केलेल्या आरोपींमध्ये शाहरूख शेख, तौसीफ पटवेगार, साहिल पटवेगार, तनवीर मुजावर, नौशाद मुजावर, अब्दुल रौफ सिद्दीकी, जरियाफ इनामदार, समीर गैरजवाला, आश्रफ सिद्दीकी, इजाज शेख, साहिल हकीम, परहाज नाईकवडे, चीलाल शेख, आकिब सिद्दीकी, आणि रिजवान पेटकर यांचा समावेश आहे.
Posted inकोल्हापूर
सिद्धार्थनगर दंगल प्रकरणात आणखी १५ आरोपींना अटक; १५ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
