पोलिसांची नाकेबंदी तोडून ‘वंचित’चा RSS कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ निघणारच – अमित भुईगळ

पोलिसांची नाकेबंदी तोडून ‘वंचित’चा RSS कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ निघणारच – अमित भुईगळ

: पोलिसांची नाकेबंदी तोडून ‘वंचित’चा RSS कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ निघणारच – अमित भुईगळ
छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि इतर आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश मोर्चा’ला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शहरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले आहे. क्रांतीचौक पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत मोर्चा आयोजकांना ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८’ नुसार नोटीस बजावली आहे, तरीही वंचित बहुजन आघाडी ठाम आहे.
पोलिसांनी नाकारली परवानगी, भुईगळ ठाम:
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मुख्य मागणीसाठी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता क्रांतीचौक ते थेट RSS कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची योजना होती. यासंदर्भात २१/१०/२०२५ रोजी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आला होता.
मात्र, क्रांतीचौक पोलीस ठाण्याने ‘कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता’ लक्षात घेऊन मोर्चाला परवानगी नाकारली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, परवानगी नाकारण्यात आली असल्याने आयोजकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा बेकायदेशीर कृत्य झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
‘परवानगी मिळो वा न मिळो, मोर्चा निघणारच’
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीचे युवा राज्य सदस्य, अमित भुईगळ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “जनआक्रोश मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निघेल. प्रशासनाने परवानगी दिली नाही, तरीही आम्ही नियोजित मार्गाने RSS कार्यालयापर्यंत धडक देऊ. हा आमच्या हक्काचा आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आम्ही संघर्षासाठी सज्ज आहोत.”
यामुळे, २४ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौक ते RSS कार्यालयादरम्यान मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही बाजूंच्या भूमिकेमुळे शहरात एक प्रकारचा संघर्षमय ‘वेट अँड वॉच’चा माहोल तयार झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *