महान साहित्यिक लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन ईश्वरपुर ( इस्लामपुर ) येथे!माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; सावित्रीमाई साठे आणि प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती

महान साहित्यिक लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन ईश्वरपुर ( इस्लामपुर ) येथे!माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; सावित्रीमाई साठे आणि प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती

महान साहित्यिक लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन ईश्वरपुर ( इस्लामपुर ) येथे!
माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; सावित्रीमाई साठे आणि प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती
इस्लामपुर : साहित्यरत्न, जगद्विख्यात थोर साहित्यिक लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता ईश्वरपुर (ता. वाळवा) येथे संपन्न होणार आहे. राजारामबापू सहकारी बँक लि., पेठ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य मा. आ. जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते भूमीपूजन होणार असून, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई श्रीमती सावित्रीमाई साठे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
यावेळी राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा भूमीपूजन समारंभ नगरपरिषद समोर, उरुण-ईश्वरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक
अध्यक्ष उत्तम चांदणे यांच्यासह सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व समस्त मातंग समाज, वाळवा तालुका यांच्यावतीने या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
समितीचे प्रमुख सदस्य:
मा.श्री. डॉ. विजय चांदणे, नंदकुमार नांगरे, विकास बल्लाळ, प्रा. सुभाष वायदंडे, विजय लोंढे, संतोष चांदणे, सागर चव्हाण (नाना), सदाभाऊ चांदणे, शशिकांत वायदंडे, सतीश लोंढे, संजय खवले, सुशील सावंत, मानसिंग बल्लाळ, अजिंक्य बल्लाळ, सम्राट बाबर, दिनकर मस्के, विक्रम बाबर, संदीप पाखरे, दिलीप कुरणे, सुधीर कांबळे, शशिकांत नांगरे, अमोल पाटोळे, महेश घस्ते.
तसेच, मा.श्री. डॉ. सुधाकर वायदंडे, शंकर महापुरे, संदीप पाटोळे, तानाजी साठे, दयानंद चव्हाण, रवी बल्लाळ, विनोद बल्लाळ, संदीप औंधडे, प्रदीप आवळे, अशोक वायदंडे, रमेश सकटे, कबीर चव्हाण, राजाभाऊ गायकवाड, अमोल लेखंडे, सागर वाघमारे, हर्षद बल्लाळ, अमित पाटोळे, सागर अ. चव्हाण, विराजी थोरखेड, शशिकांत चव्हाण, गणेश चांदणे, सौरभ साठे, प्रदीप साठे हेही निमंत्रक मंडळात सहभागी आहेत.
क्रांती योध्दा
यावेळी मा.श्री. रामभाऊ देवकुळे, मा.श्री. बापुराव बडेकर, मा.श्री. भास्कर चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
राजारामबापू सहकारी बँक लि., पेठचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक सी. प्रदीप बाबर आणि संचालक मंडळाने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *