ब्रेकिंग न्यूज: धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह ओढ्यात फेकला; दानवाड परिसरात भीतीचे वातावरण!
सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर, पहाटे दानवाड (सदलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील) येथील एक्संबा दानवाड ब्रिज जवळील ओढ्यात एका अज्ञात पुरुषाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह ओढ्याच्या काठाशी फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे.
घटनेचा तपशील आणि पोलिसांची कारवाई:
- घटना: अज्ञात पुरुषाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह ओढ्यात फेकला
- परिणाम: या घटनेमुळे दानवाड परिसरात मोठी खळबळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
- पोलिसांची तपासणी: घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला आहे
- गुन्हा नोंद: सदर घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे
- आरोपीचा शोध: संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या विशेष पथकांना गुप्त माहितीदारांसह कामाला लावण्यात आले आहे
मृत व्यक्तीचे वर्णन (ओळख पटवण्यासाठी):
पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी खालील तपशील जाहीर केला आहे - उंची: अंदाजे ५ फूट ९ इंच.
- रंग: काळसर वर्ण.
- केस: थोडे लांब.
- दागिना: उजव्या हातात चांदीचा कडा.
- पोशाख:
- क्रीम रंगाचा टीशर्ट (गर्दनपटी नसलेला).
- काळ्या रंगाचे स्पोर्ट्स जॅकेट.
- मेहंदी रंगाची नाईट पँट
नागरिकांना आव्हान:
या व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती असल्यास किंवा ओळख पटल्यास नागरिकांनी त्वरित सदलगा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
पहाटे घडलेल्या या घटनेमुळे दानवाड परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी गस्त वाढवून सुरक्षा कडेकोट केली आहे
