सौ. ज्योती अतुल दळवी
कुरुंदवाडच्या सारीपाट खेळात काँग्रेसचे निष्ठावंत आणि सतेज पाटील प्रेमी माजी नगराध्यक्षा ज्योती अतुल दळवी यांना उमेदवारी द्यावी : कुरुंदवाडकरांची मागणी.
कुरुंदवाड, दि.२ (राजगोंडा पाटील)
गेल्या पंधरा दिवसापासून कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत घमासान चालू आहे. कुरुंदवाड शहराचे काँग्रेसचे शहर प्रमुख विजय पाटील यांनी स्वतःची उमेदवारी डावलून माजी नगराध्यक्षा सौ. त्रिशला जवाहर पाटील यांना द्या अशी मागणी केली, तर कुरुंदवाड शहराचे भूषण रामचंद्र डांगे यांनी त्यांच्या स्नुषा माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा उदय डांगे यांना भाजप, महाविकास आघाडी, इतर कोणाकडूनही उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. तसे तर रामभाऊ डांगे ही कुरुंदवाड शहरातील अशी व्यक्ती आहे की त्यांना कोणत्या पक्षाची गरज नाही, पक्षालाच त्यांची गरज असेल असे व्यक्तिमत्व. पण गेल्या पंधरा दिवसापासून नगराध्यक्ष पदाच्या जागा वाटपाबाबत शहरात घमासन चालू आहे. मयूर दूध संघाचे संजय पाटील यांनी सुरुवातीला आपले बंधू विजय पाटील जे कुरुंदवाड शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आहेत, त्यांनाच उमेदवारी मिळावी अन्यथा मी भाजपा सोडेण असा इशारा दिला. त्यामुळे भाजपाचे तिकीट त्यांच्या भावाच्या पत्नीलाच मिळावं यासाठी लढत आहेत. पण विजय पाटील स्वतः मी किंवा माझी पत्नी उद्याच्या पालिकेच्या निवडणुकीत राहणार नसून जवाहर पाटील यांची पत्नी माजी नागराध्यक्ष त्रिशला पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. यामुळे कुरुंदवाड शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांचे चुलते भीमराव पाटील हे विजय पाटील यांना हा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित करत मी पाटील घराण्याचा प्रमुख असून माझे आजोबा पटवर्धन संस्थानकालात आमदार होऊन शहराचा विकास केला आहे. माझ्या वडिलांनी या पदावर काम, निधर्मी आणि जातीपातीच्या भिंती तोडून शहराला एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे विजय पाटील यांना उमेदवारी दुसऱ्यांना देण्याचा अधिकार नाही,असा हक्क बजावला आहे. त्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जयराम पाटील आणि त्यांचे चुलते भीमराव पाटील यांच्याच घराण्यात लाथाळ्या लागल्या आहेत. त्यामुळे कुरुंदवाड शहरात सर्वधर्मीय, प्रामाणिक आणि उच्चशिक्षित अशा ज्योती अतुल दळवी या काँग्रेस आणि सत्तेज पाटील प्रेमी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे. दोन्ही पाटील घराण्यातील वाद आणि ज्योती दळवी यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत केलेले काम पाहता त्यांना सतेज पाटील यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ज्योती दळवी नगराध्यक्षा असताना विरोधकांनी विरोध केल्यावर अशा कडाडत होत्या की विरोधकांची तोंड बंद होत होती. पण त्यांनी शहरातील आवश्यक गरजा म्हणजे विज, गटारी, रस्ते, पाणीपुरवठा, आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी यांना प्राधान्य दिले. महिलांचे सक्ष्मीकरण, महाशिवरात्री, वृक्षारोपण, आणि महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेली कामे आजही शहरवासीयांच्या स्मरणात आहेत. शहरातील कोणताही व्यक्ती जर एखादी अडचण घेऊन आला किंवा प्रश्न घेऊन आला तर ज्योती दळवी यांनी स्वतःच्या घरातून ही त्यांना न्याय मिळवून दिल्या आहेत. सत्तेच्या या साठमारीत सौ. ज्योती दळवी सारख्या व्यक्तीला सतेज पाटील यांनी उमेदवारी द्यावी, नक्कीच त्या निवडून येतील अशी इच्छा कुरुंदवाडवासियांनी यांनी व्यक्त केली आहे.
चौकट
सौ. ज्योती अतुल दळवी या नागराध्यक्ष असताना शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जातीपातीच्या भिंती तोडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दळवी वहिनींनी काम केले आहेत. शिवाय आजतागायत राष्ट्रीय काँग्रेस आणि जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांच्या घराण्यावर त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे निष्ठा ठेवली आहे. निधर्मी, निष्पाप, आणि उच्चशिक्षित अशा सौ. ज्योती अतुल दळवी यांना सतेज पाटील यांनी उमेदवारी द्यावी किरण भोसले उद्योजक आणि युवा नेतृत्व
