📰 मद्य तस्कर अभिजीत डवरी स्थानबद्ध : एक्साईज कागल विभागाची कठोर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क कागल निरीक्षक शंकर आंबेरकर यांची माहिती

कोल्हापूर, दि. २ (प्रतिनिधी) –
राज्य उत्पादन शुल्क कागल विभागाने निढोरी (ता. कागल) येथील सराईत मद्य तस्कर अभिजीत ऊर्फ पांडुरंग चंदर डवरी याच्यावर कठोर कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे.
डवरी याच्यावर निढोरी परिसरात गावठी दारूची विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी यापूर्वी ६ गुन्हे दाखल होते. तो सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याविरुद्ध कलम ९३ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
🔥 MPDA कायद्यानुसार स्थानबद्ध
या गंभीर नोंदी लक्षात घेऊन, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अभिजीत डवरी याच्यावर ‘महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या आणि मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ (MPDA) अन्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
या आदेशानुसार, डवरीला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षकांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. चालू वर्षात MPDA कायद्यानुसार दाखल झालेला हा दुसरा प्रस्ताव आहे.
👮♂️ कारवाईत सहभागी अधिकारी
ही महत्त्वपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिचांळकर, एक्साईज कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उप अधीक्षक युवराज शिंदे, आणि कागल निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत एक्साईज कागल पथकातील दुय्यम निरीक्षक प्रशांत नागरगोजे, चंदूरे, नायकुडे, तसेच कॉन्स्टेबल सचिन काळेल, लक्ष्मण येडगे, अमर पाटील, आणि वहान चालक केतन दराडे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
\

