विशेष प्रतिनिधी : नारायण कांबळे
राधानगरी पोलीस ठाण्याने कोल्हापूर शहरातील विविध भागातून चोरलेल्या तब्बल तेरा मोटारसायकली हस्तगत करून मोठी कामगिरी केली आहे. या चोरीच्या मोटारसायकलींची एकूण किंमत ₹ २,५०,०००/- आहे. या प्रकरणी युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे (वय ३६, रा. नरतवडे, ता. राधानगरी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहिती आणि तपास पथक
राधानगरी पोलीस ठाण्याचे ट्राफिक पोलीस अंमलदार रणधीर वरोटे यांना युवराज उर्फ विनायक कांबळे याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना दिली.
पोलीस निरीक्षक गोरे यांनी तातडीने सहायक फौजदार पारळे, पोहेकॉ खामकर (६१४), पोहेकॉ शेळके (२१५२), पो शि वरोटे (२३७७), पो शि पोवार (२३७८), पोशि पाटील (५५९), पोशि गुरव (१४१५), पो शि किरण पाटील (१४८८), पो शि भोपळे (२१२६), पोशि बरगे (१४१०), आणि चालक गुरव (२१४४) यांचे एक तपास पथक नेमले. या पथकाने कौशल्यपूर्ण चौकशी करून आरोपीकडून या १३ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या.
🏍️ जप्त केलेल्या गाड्यांचा तपशील
विनायक कांबळे याने कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणांहून या गाड्या चोरल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेल्या १३ मोटारसायकलींपैकी आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ०४ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात ०४ असे नोंद आहेत. उर्वरित ०५ गाड्यांची नोंदणी माहिती अपूर्ण असल्याने त्यांच्या मालकांचा शोध घेणे सुरू आहे.
जप्त केलेल्या गाड्या आणि नोंद असलेले गुन्हे (काही उदाहरणे):
- स्प्लेंडर प्लस: नंब MH-०९-FF- ८८३६ (किंमत ₹ २०,०००/-). जुना राजवाडा पोलीस ठाणे, गुरनं ६०७/२०२५, कलम ३०३(२).
- हिरो होंडा स्पेल्डर: नंब MH-०९-AA-४२७८ (किंमत ₹ १०,०००/-). जुना राजवाडा पोलीस ठाणे, गुरनं ३१२/२०२५, कलम ३०३(२).
- हिरो फॅशन प्रो: नंब MH-०९-DS-५२७६ (किंमत ₹ १०,०००/-). जुना राजवाडा पोलीस ठाणे, गुरनं ४३७/२०२५, कलम ३०३(२).
- हिरो स्पेल्डर प्लस: नंब MH-०९-EQ-४७८७ (किंमत ₹ २०,०००/-). शाहुपुरी पोलीस ठाणे, गुरनं ७०५/२०२५, कलम ३०३ (२).
- हिरो स्पेल्डर प्लस: नंब MH-११-BJ-१६९७ (किंमत ₹ २०,०००/-). शाहुपुरी पोलीस ठाणे, गुरनं ४३२/२०२५, कलम ३०३ (२).
📞 नागरिकांना आवाहन
या मोटारसायकलींच्या चेसिस (Cheeses) आणि इंजिन (Engine) क्रमांकाची माहिती पाहून ज्या नागरिकांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत, त्यांनी तात्काळ राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार सो, अप्पर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार सो, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
संपर्कासाठी: - पोलीस निरीक्षक संतोष गोरे: मो नं ८९७५५०५९००
- राधानगरी पोलीस ठाणे: संपर्क नं ०२३२२१/२३४०३३
