महात्मा फुले यांना १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त परिवर्तन फाउंडेशनतर्फे अभिवादन: ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
कोल्हापूर : प्रतिनिधी
महात्मा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर येथे परिवर्तन फाउंडेशन आणि सत्यशोधक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना ॲड. धनंजय पठाडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “महात्मा फुले यांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा दीपस्तंभासारखा आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणारे ते थोर नेते होते.”
ॲड. पठाडे यांनी पुढे सांगितले की, हंटर कमिशन, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ ते प्रत्येक आंदोलनापर्यंत वंचित घटक हाच महात्मा फुलेंच्या मांडणीचा केंद्रबिंदू होता. विधवा महिलांसाठीचे त्यांचे कार्य दिशादर्शक असून त्यांनी दीन-दुबळ्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
या अभिवादन समारंभास परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, सकल मराठा समाजाचे निवास सूर्यवंशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील सामंत, राष्ट्रीय खेळाडू डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, राज कुरणे, प्रा. शालन सोरटे, पेत्रस सोरटे, बार्टी समाज कल्याणच्या आशा रावण, जे.बी. आत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
