नवे दानवाड येथे माजी सभापती कै. विरगोंडा पाटील यांचा १८ वा स्मृती दिन संपन्न; विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवे दानवाड: (प्रतिनिधी)
नवे दानवाड येथील माजी पंचायत समिती सभापती आणि गोरगरिबांचे कैवारी कै. विरगोंडा पाटील (तात्या) यांच्या १८ व्या स्मृती दिनानिमित्त आणि ज्ञानगंगा हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते
कै. विरगोंडा पाटील यांची दानवाड परिसरात ‘तात्या’ या नावाने विशेष ओळख होती. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. तसेच, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने त्यांनी ‘ज्ञानगंगा हायस्कूल’ची स्थापना केली होती
प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन:
स्मृती दिनानिमित्त सकाळी १० वाजता मजरेवाडी येथील विनोद भोला कागले यांच्या हस्ते कै. विरगोंडा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले
उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी दानवाडचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील, पोलीस पाटील स्वाती कुन्नुरे, शाळेचे चेअरमन शिवगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य पूनम साळुंखे, निर्मला चौगुले, सातगोंडा पाटील, प्रकाश अंबुपे, सचिन अंबुपे, राजू पाटील, रामचंद्र बेरड, भरमगोंडा पाटील, डॉ. सुदर्शन करोले, संजय परिट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन:
दुपारी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक उमेश पोळ यांनी स्वागत व प्रास्ताविक करून शाळेचा वार्षिक अहवाल वाचन केला. शेवटी धोंडीबा देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले

