ऑस्ट्रेलियन पार्लमेंट मध्ये मदन पवार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत झळकावली.
भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचा सिडनी मध्ये गौरव :
कोल्हापूरचे मदन पवार यांचा ऑस्ट्रेलियात सन्मान
कोल्हापूर, दि. २० (प्रतिनिधी) कोल्हापूर मध्ये स्थायिक झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त सीमाशुल्क अधिकारी मदन पवार यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची इंग्रजी प्रत ऑस्ट्रेलियातील सिडनी पार्लमेंट हाऊसमध्ये प्रदर्शित करुन भारतीय लोकशाही मूल्यांचा गौरव केला.
भारतीय राज्यघटनेची उद्देशिका सिडनी (ऑस्ट्रेलिया) पार्लमेंट हाऊसमध्ये प्रदर्शित केलेली ही कृती भारतीय लोकशाही मूल्यांना जागतिक स्तरावर अभिवादन करणारी प्रेरणादायी ठरली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना विविध देशांच्या घटनेंचा अभ्यास केला होता.
ऑस्ट्रेलियातील संविधानाचाही त्यात समावेश होता. याच ऐतिहासिक संदर्भाची जाणीव ठेवून मदन पवार यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तेथील संविधानाचा अभ्यास केला. सिडनीतील स्टेट लायब्ररीचे गोल्ड कार्ड सदस्य असलेल्या पवार यांनी अभ्यास करताना भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाही मूल्याची जाणीव प्रदर्शित केली.
ऑस्ट्रेलियन पार्लमेंट मधील
या कृती चा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा जागतिक स्तरावरील स्वीकार असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन लोकशाही राष्ट्रांतील संवैधानिक मूल्यां बाबत या परस्पर आदर अधोरेखित झाला आहे. शेतकरी व देशस्तरावरील पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक व संवैधानिक मूल्ये सर्वांसमोर आणण्याचा मदन पवार यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सिडनी पार्लमेंट मध्ये जाताना माझ्याकडे कोणतेही पद, प्रतिष्ठा, शिफारस, अधिकृत निमंत्रण नव्हते. एक शेतकरी म्हणून मी प्रवेश घेतला होता.
सिडनी पार्लमेंट मध्ये भारतीय संविधानाचा आणि त्याचबरोबर भारतातील एका खेडेगावातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा झालेला सन्मान आहे.
चौकट –
सेवानिवृत कस्टम अधिकारी मदन पवार यांच्या कन्या ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून स्थायिक आहेत. यानिमित्त ते ऑस्ट्रेलियाला वारंवार जात असतात. हे दौरे केवळ पर्यटनापुरते मर्यादित न ठेवता अभ्यासात रूपांतरित झाले आहेत. सिडनीतील स्टेट लायब्ररीचे गोल्ड कार्ड सदस्य असलेल्या पवार यांनी तेथे जाऊन ऑस्ट्रेलियन राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला आहे.
