महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त कार्याचा जागर; सोलापुरात ‘संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कारां’चा ऐतिहासिक सोहळा संपन्न

डॉ. अॅड. सुरेश माने, संपादक महादेव नरोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील धुरिणांचा सन्मान; जनसेवेच्या अखंड यज्ञकुंडात समिधा अर्पण करणाऱ्या मान्यवरांचा गौरव


सोलापूर:
स्त्री शिक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाचे उद्धारकर्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीचे ऐतिहासिक पर्व सध्या महाराष्ट्र अनुभवत आहे. या निमित्ताने त्यांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आणि संघर्षनायक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण सोहळा सोलापूरच्या डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांची पताका खांद्यावर घेऊन लढणाऱ्या समाजातील विविध घटकांचा यावेळी सन्मानाने गौरव करण्यात आला.
विद्वत्ता आणि कर्तृत्वाचा संगम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले होते. याप्रसंगी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ डॉ. अॅड. सुरेश माने, ‘दैनिक जनमत’चे संपादक महादेव नरोटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी (सावकार) आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुनील बनसोडे यांना त्यांच्या अजोड कार्याबद्दल ‘संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

“जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकशाहीचा आधार” – आ. सचिन कल्याणशेट्टी
या सोहळ्याला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली उपस्थिती दर्शवली. “संघर्षनायक मीडियाने जनसामान्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवून लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने मजबूत केला आहे. समाजातील उपेक्षितांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, हा महात्मा फुलेंच्या विचारांचाच सन्मान आहे,” असे गौरवद्गार त्यांनी काढले.

पुरस्कारांचा सविस्तर तपशील
महात्मा फुलेंनी दिलेल्या समतेच्या मंत्राला अनुसरून विविध श्रेणीत खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले:
१. आत्मसन्मान गौरव पुरस्कार (मान्यवर यादी)
समाजाच्या विविध स्तरांत उल्लेखनीय काम करणाऱ्या ३२ मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले:
- प्रशासकीय व सेवा क्षेत्र: गुलाबचंद श्रीकृष्ण शहा (मुस्ती), सतिश नागनाथ गायकवाड (सहकार विभाग), दिपाली काळे (सहाय्यक पोलीस आयुक्त, सोलापूर), सतीश दामोदर राजगुरू व विशाल रामचंद्र शितोळे (राज्य उत्पादन शुल्क), हरि चंदू काळे (विज वितरण).
- समाजसेवा व आरोग्य: अतिश शिरसट (संभव फाऊंडेशन – मनोरुग्ण सेवक), मौलाली सैपन शेख (इंगळगी), श्रीमती कविता पवार (आदिवासी पारधी सेवा संघ), सुनिता परशुराम भालेकर (जोगेश्वरी).
- पत्रकारिता व साहित्य: दत्ता सूर्यवंशी (उप संपादक, दैनिक सम्राट), ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव धेंडे, रुपाली नीलेश अवयरे (दैनिक सकाळ, पुणे), प्रथमेश बनसोडे (स्वराज्य माझा न्यूज), उमेश राम काळे (महाराष्ट्र पोलीस टाइम्स), एकनाथ शिवराम अडसूळ (क्राईम न्यूज), संजय विठ्ठल राक्षसे (नांदेड), मनीषा पिंटू वराळे (कवयित्री).
- इतर मान्यवर: शफी इनामदार, गंगाधर कांबळे, मिलिंद खरात, परमेश्वर रणसुरे, पंचाप्पा धनशेट्टी, संदीप प्रल्हाद कांबळे, रामदास पुजारी, मनीषा मोरे, शशिकांत कांबळे, बबन तांदळे, कृष्णा कांबळे, सुरेश व छायाताई सातारकर, अविन राठोड आणि विलास तुकाराम लोंढे.

२. आदर्श समाज भूषण पुरस्कार
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या १९ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला:
- नळपती कुंडलीक बनसोडे (माजी सभापती), धनेश सुभाष आचलारे (शिवसेना उप जिल्हाप्रमुख), युवराज कोंडीबा सरवदे (नगरसेवक), ब्रम्हनाथ अण्णाराव पाटील, युवराज भिमराव राठोड (सोनाई फाऊंडेशन), रविकांत सिद्राम कांबळे, लक्ष्मण श्रीरंग केत, रामहरी ज्ञानदेव चौगुले, रेवणसिध्द केरू कांबळे, मनोज भिमय्या चलवादी, सुधीर महादेव बहिरवाडे, गणेश शंकर कोळी, सुभाष मसाजी लोखंडे, विनोद सुरेश पाटील, रावसाहेब बाजी भोसले, दयानंद बनसोडे (बहुजन हक्क अभियान), सुगत चंद्रशा धसाडे, जिवन मल्लिकार्जुन चाबुकस्वार आणि सुनिता परशुराम भालेकर.

३. आदर्श सरपंच/माजी सरपंच पुरस्कार
ग्रामविकासात योगदान देणाऱ्या १० लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला:
- लक्ष्मीबाई हारिबा गायकवाड (होटगी), नागराज कल्याणराव पाटील (मुस्ती), विश्रांती शावरसिद्ध पाटील (आचेगांव), सिताराम रामदास राठोड (बक्षीहिप्परगा), अरुणा राज सांळुके (बोरामणी), दिपाली संतोष गायकवाड (होटगी स्टेशन), महादेव आंबादास जाधव (गंगेवाडी), शरणाप्पा शंकर कोळी (उळेवाडी), शिवराज दाजी जाधव (मुळेगांव) आणि मदनराव दि. कुलकर्णी (जालना).
फुले यांच्या कार्याचा पुनरुच्चार
प्रमुख पाहुणे डॉ. अॅड. सुरेश माने यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा पट उलगडत, आजच्या काळातही त्यांचे विचार कसे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, हे पटवून दिले.
यावेळी पँथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मुळे, महाराष्ट्र प्रभारी उमेश जामसंडेकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण मेढे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ज्योतीताई झरेकर, महेंद्र वाघमारे, आशा मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आरोही जमादार यांनी केले. प्रास्ताविक उमेश जामसंडेकर यांनी मांडले, तर अमोल कुरणे यांनी आभार मानले. दक्षिण विभाग प्रमुख सागर माने आणि जिल्हाध्यक्ष विनोद बनसोडे, चेतन रुचनभैरे, अनिल राठोड, गणेश चव्हाण, गणेश बनसोडे यांच्या नियोजनामुळे हा सोहळा अभूतपूर्व ठरला.






