इचलकरंजी: ५ लाखांची जबरी चोरी करणाऱ्या तीन आंतरराज्यीय आरोपींना जामीन मंजूर!ॲड. ममतेश आवळे यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद; ३५ दिवसांनंतर आरोपींची कारागृहातून सुटका

इचलकरंजी: ५ लाखांची जबरी चोरी करणाऱ्या तीन आंतरराज्यीय आरोपींना जामीन मंजूर!ॲड. ममतेश आवळे यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद; ३५ दिवसांनंतर आरोपींची कारागृहातून सुटका

इचलकरंजी: ५ लाखांची जबरी चोरी करणाऱ्या तीन आंतरराज्यीय आरोपींना जामीन मंजूर!

ॲड. ममतेश आवळे यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद; ३५ दिवसांनंतर आरोपींची कारागृहातून सुटका

इचलकरंजी (प्रतिनिधी):
येथील गजबजलेल्या महासत्ता चौकात एका नागरिकाला हिसडा मारून ५ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याप्रक्रणी गेल्या ३५ दिवसांपासून कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन आंतरराज्यीय आरोपींना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने इचलकरंजी येथील नामवंत विधीज्ञ ॲड. ममतेश आवळे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. या यशानंतर ॲड. आवळे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील महासत्ता चौकात ५ लाख रुपये हिसकावून पळून गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये:

  • जमाल युसूफ शेख (रा. पंजाब)
  • इशाक शेख (रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश)
  • बिलाल शेख (रा. उत्तर प्रदेश)
    या तिघांचा समावेश होता. त्यांच्याविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सुरक्षा संहिता (BNSS) चे कलम ३०४(२), ३१८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यापासून हे तिन्ही आरोपी कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.

न्यायालयात काय घडले?

आरोपी गेल्या ३५ दिवसांपासून जेलमध्ये असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी २५ मे २०२६ रोजी इचलकरंजी येथील कायदेतज्ज्ञ ॲड. ममतेश आवळे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली व बचावाची विनंती केली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ॲड. आवळे यांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज दाखल केला. २८ मे २०२६ रोजी या जामीन अर्जावर न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान ॲड. ममतेश आवळे यांनी कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवत आणि पोलिसांच्या दाव्यातील त्रुटी समोर आणत जोरदार युक्तिवाद केला. तसेच आरोपींच्या बाजूने सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

“आरोपींच्या बाजूने सादर करण्यात आलेली न्यायालयीन निरीक्षणे आणि बचावाचे मुद्दे ग्राह्य धरून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.”

ॲड. ममतेश आवळे यांचे कौतुक

अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आंतरराज्यीय आरोपींशी संबंधित असलेल्या या संवेदनशील प्रकरणात अवघ्या काही दिवसांतच कायदेशीर लढाई जिंकून आरोपींना जामीन मिळवून दिल्याबद्दल विधी क्षेत्रात व सामाजिक स्तरातून ॲड. ममतेश आवळे यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *