डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरात विविध, पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन

कोल्हापुरातील बिंदू चौक येथे विविध, पक्ष संघटनांच्या वतीने निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आजाद समाज पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष आठवले, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, जनसंघर्ष क्रांती सेनेचे अध्यक्ष समीर विजापूरे,सर्वधर्मीय संघटनेचे हाजी जहांगीर आत्तार
तसेच भीम आर्मी, राष्ट्रीय बहुजन मिशन आदी विविध पक्ष, संघटनांच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.