रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ. स्नेहा पालये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मोजू तरी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तू देव नव्हतास, तू देवदूत ही नव्हतास, तू मानवतेची पुजा करणारा खरा महामानव होतास, अशा क्रांतिकारक काव्य शैलीत महासूर्याला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. रोहित मयेकर, संचालक श्री. सुरेंद्र माचिवले, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, प्रा. अवनी नागले, प्रा. राजेश धावडे, प्रा. कविता जाधव, प्रा. शामल करंडे, प्रा. समृद्धी भोळे, कर्मचारी अमेश गावडे, किरण मुंडेकर मिनाक्षी ठीक, विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
कोविडचा 19 चा कालावधी लक्षात घेता, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्स ठेवून अभिवादन कार्यक्रम करण्यात आला.