ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर आपल्या प्रश्नांवर आपणच आवाज उठवायला हवा- सुहास खंडागळे
गाव विकास समितीचा लोकशाही मेळावा,स्त्री शक्ती सन्मान,व समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न!
55 महिलांचा मायेची साडी भेट देऊन स्त्री शक्ती सन्मान!,सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
देवरुख:-ग्रामीण भागांचा विकास साधायचा असेल तर आपण आपल्या प्रश्नांवर आवाज उठवायला पाहिजे,सामान्य माणसाने आपले लोकशाहीतील हक्क अधिकार समजुन घ्यायला हवेत,लोकशाहीत आपण मालक आहोत ही भावना लोकांमध्ये हवी असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी लोकशाही मेळाव्यात व्यक्त केले.
देवरुख येथे आयोजित लोकशाही मेळावा,स्त्री शक्ती सन्मान व समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना सुहास खंडागळे यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर भाष्य केले. ग्रामीण भागात लोकशाहीचे महत्त्व प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचायला हवे,संविधान प्रत्येक नागरिकाने वाचायला हवे,ज्या संविधानावर हा देश चालतो,ही व्यवस्था चालते ते संविधान प्रत्येक नागरिकाने समजून घ्यायला हवे असे आवाहन सुहास खंडागळे यांनी यावेळी केले.कोकणातील वाढती बेरोजगारी ही राजकीय अनास्थेमुळे असून आता आपल्या गावातील समस्यांपासून प्रत्येकाने संबंधित लोकांना जाब विचारायला पाहिजे.येथील प्रश्नांवर आपण स्वतः आवाज उठवायला हवा आणि ते काम गाव विकास समिती करत आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून विकास साधला पाहिजे,असेही सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.
महिला बचत गटांसाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था उभारावी असे सांगताना ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना सोबत घेऊन गाव विकास समितीच्या माध्यमातून महिला पतसंस्था सुरू करण्याचा विचार यावेळी खंडागळे यांनीं व्यक्त केला. ग्रामीण भागातील आज गावागावात सुरू होणारे क्रशर हे राजकिय लोकांचे असून ते बंद करण्यासाठी त्या त्या गावातील ग्रामपंचायत व सरपंचांनी,ग्रामस्थानी क्रशरना दिलेला ना हरकत दाखला रद्द करून गावात असणारे विनाशकारी दगड उत्खनन व क्रशर बंद करावेत असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले.
यावेळी संगमेश्वर तालुक्यातील 55 महिलांचा मायेची साडी देऊन स्त्री शक्ती सन्मानाने गौरव करण्यात आला. या वेळी फिझा खान,फझीलत तोदलबाग,उझमा खान,समिना खल्पे,शबाना काझी,रुबीया काझी,सायली जाधव,
शुभांगी तापेकर,किरण जाधव,युगेश्री भारती,स्वप्नाली अंबुरे,गिता लिंगायत,साक्षी नटे,अंकिता किर्वे,मनिषा कांबळे,रेवती सावंत,सुचिता मोहिते,रेश्मा मुंडेकर,संचिता कांगणे,जयश्री गोंधळी,वैशाली कांगणे,संजिवनी कांगणे,प्रभावती पेंढारी,शालिनी सालम,अस्मिता पाष्टे,निशा बोथले,साक्षी तांबे,सोनाली काटकर,चेतना जड्यार,मनिषा जाधव,सुप्रिया बेंद्रे,रसिका शिर्के,पुर्वा जाधव,नेहा शितप,शारदा तांबे,नेहा गोवळकर,वर्षा कांबळे,प्रतिक्षा लिंगायत,ज्योती जाधव,सुचिता नेटके,दर्पणा धावडे,रिया मोहिते,तनुजा भुरवणे,सानिका कदम,समृद्धी सोलकर,मयुरी गुरव,श्वेता पवार,रश्मी खानविलकर, मनिषा वगरे,अमृता शिंदे,रसिका कदम,अंकिता पेंढारी, वंदना रांगणे,वंदना जोयशी तर १६ सामाजिक कार्यकर्ते यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अनिल गुरव,परशुराम चोगले,महेंद्र करंबेळे,जमीर खलफे,महेश धावडे,संतोष देवळेकर,आनंद तापेकर,सचिन गेल्ये,मुकुंद गोणभरे,निखील कोळवणकर,आसिफ खल्पे,अब्दुलमुनाफ खतीब,कपिल कांबळे,स्वप्निल खापरे,युसुफ हमदारे,प्रकाश गमरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड,महिला संघटना अध्यक्षा सौ दिक्षा खंडागळे-गिते, उपाध्यक्ष सौ अनघा कांगणे,सरचिटणीस डॉ मंगेश कांगणे, जिल्हा उपाध्यक्ष मुझमील काझी,जिल्हा संघटक मनोज घुग,दैवत पवार,सुकांत पाडाळकर,अमित गमरे,ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांसह गाव विकास समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी केले.प्रास्ताविक संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष अमित गमरे तर आभार प्रदर्शन सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे यांनी केले.