Bipin Rawat passes away : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ हवाई दलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) त्यांच्या पत्नीसह होते. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 13 जण होते.