अनिल परबांचा दापोली रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द : किरीट सोमैया

अनिल परबांचा दापोली रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द : किरीट सोमैया

ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परबांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांचा कडील सुनावणीत दाखल केले असल्याचे सांगीतले.

एफिडेविटमध्ये म्हटले आहे की

“मुरुड ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील गट नं. 446 पैकी क्षेत्र 4200.30 चौ.मी., उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडून निर्गमित करणेत आलेल्या बिनशेती आदेशाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 257 अन्वये पुनरिक्षणाबाबतची सुनावणी होऊन या प्रकरणी कार्यालयाकडील आदेश के महाकार्या/एल-अकलम 257/अर्ज क. 37/2021 दिनांक 03/12/2021 अन्वये निर्णय झालेला असून सदरील आदेशान्वये उपविभागीय अधिकारी दापोली आदेश एलएनएएसआर 122/2017 दिनांक 12/09/2017 रोजी बिनशेती आदेश रद्द करण्यात आला आहे” :