रत्नागिरी -राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या सर्व आरक्षित जागा अनारक्षित (सर्वसाधारण) करण्यात आल्या आहेत. वरील आदेशान्वये २१ डिसेंबर २०२१ रोजीच्या मतदानाची तसेच सुधारीत कार्यक्रमानुसार १८ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी १९ जानेवारी २०२२ रोजी होणार असून आचारसंहितेचा कालावधी हा मतमोजणीच्या दिनांकापर्यंत म्हणजेच १९ जानेवारी २०२२ पर्यंत लागू राहील, असे नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
Posted inरत्नागिरी