रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात शंभर नवीन रुग्ण

रत्नागिरी: मागील चोवीस तासात शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या तिनशेच्या पुढे गेली आहे. वाढती रुग्ण संख्या जिल्ह्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.
मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दोन दिवसांत तर पावणे दोनशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासात 1053 रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 100 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 953 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 16 जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या 315 अ‍ॅक्टिव्ह केसेस असून त्यामध्ये 234 गृहविलगीकरणात तर 81 रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात मागील चोवीस तासात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 28 रुग्ण सापडले आहेत तर रत्नागिरीत 17, दापोली 19, खेड 15, गुहागर 6, राजापूर 8, लांजा 3, संगमेश्‍वर व मंडणगडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत.