कुरुकली येथे आज संविधान सन्मान परिषद

कुरुकली येथे आज संविधान सन्मान परिषद
……………………….

गुडाळ/ वार्ताहार संभाजी कांबळे
कुरूकली ता. करवीर येथे आरपीआय (गवई गट) यांच्यावतीने आज रविवार ९ जानेवारी रोजी संविधान सन्मान परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे अध्यक्षस्थान पी. एस. कांबळे भूषवणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून भीमराव कांबळे आहेत.
या परिषदेस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, सुबोध वाघमोडे, के. पी. पाटील, विश्वासराव पाटील, ए. वाय.पाटील, अरुण डोंगळे, चंद्रदीप नरके, प्रा. शहाजी कांबळे, सुभाष देसाई, उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये रिपाईचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष माधवी देशमुख, युवा अध्यक्ष सिद्धांत देशमुख व प्रा. चंद्रशेखर कांबळे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार होणार आहे.