राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई आता मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना चारवेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याबाबत संधी दिली. मात्र, यानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे या कामगारांवरील कारवाई मागे घेणार नसल्याचे अनिल परब म्हणाले आहेत.
आम्ही सतत पुढाकार घेत होतो, एसटी कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी चारवेळा संधी सुद्धा दिली,पण आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नाहीत. त्यामुळे आता कर्मचारी कामावर रूजू झाल्यानंतरच त्यांच्याशी सरकार बोलणी करेल असे परब यांनी स्पष्ट केले. “ज्या एसटी कामगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेण्यात येणार नसल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
आत्तापर्यंत सरकारने २८ युनियनच्या कृती समितीबरोबर करार करत बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतरही काही कर्मचारी विलिनिकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. पण सरकारने सुद्धा आता ठाम भुमिका घेत निलंबनाची कारवाई सुरु केली असुन महाराष्ट्रात पोलीस संरक्षणात एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे