पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रमाची घोषणासात टप्प्यात निवडणूक, १० मार्चला मतमोजणी

उत्तरप्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा मणिपूर या पाच राज्यातील निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून पाच राज्यांमध्ये एकूण सात टप्यात निवडणूक घेण्यात येणार असून १० फेब्रुवारीला पहिला टप्पा पार पडणार असून सातवा टप्पा ७ मार्चला पार पडणार आहे. १० मार्चला निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्यामुळे पाच राज्यांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे १०,१४, २०, २३,२७ फेब्रुवारी ३ आणि ७ मार्च या सात टप्यात निवडणूक पार पडणार आहे. यावेळी कोरोना असल्यमुळे काही बंधने निवडणूक आयोगाकडून घालण्यात आली आहेत 15 जानेवारीपर्यंत पदयात्रा, सायकल यात्रा, बाईक यात्रा कॉर्नर सभा, रॅली, जनसभा यावर बंदी घालण्यात आली आहे १५ जानेवारीनंतर कोरोनाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे डोअर टू डोअर कँपेनसाठी फक्त 5 जणांनाच परवानगी देण्यात आली असून कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारां राहणार आहे मतदानाची वेळ एक तास वाढवून देण्यात आली असून राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त डिजिटल पद्धतीनं प्रचार करावा असं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्ये 40 लाखापर्यंत उमेदवार खर्च करु शकतात तर गोवा मणिपूरसाठी २४ लाखाची खर्च मर्यादा असणार आहे. यावेळी अर्थसंकल्प वेळेवर सादर केला जाणार असून त्याला निवडणूक आयोगाकडून कुठलीही बंधने असणार नाहीत. ही निवडणुकीची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे